ताजी बातमी

वेळ रात्रीची एक आई स्वतःच्या बाळाला भाजले म्हणून इस्लामपूर मधील (सांगली) गांधी चौकात बालरोगतज्ज्ञ डॉक्टरांना भेदरलेल्या अवस्थेत धापा टाकत टाकत दाखवण्यासाठी आली ,परंतु दवाखाना बंद. माऊली कळवळत होती लागलीच ते दृश्य पाहून कदाचित दगडाला ही पाझर फुटला असता.....  एखाद्या चांगल्या हॉस्पिटलमध्ये नेने गरजेचे होते पण गावात 25 कोरोना रुग्ण सापडल्यामुळे प्रत्येक चौकात नाकेबंदी ,पावला पावला वर बॅरिकेट आणि  पोलीस आणि वेळ तर  दवडून चालणार नव्हता सर्वाना 2 मिनिटे काही सुचत नव्हते ....

तेवढ्यात कॉन्स्टेबल राहुल साळुंखे नि आपल्या बुलेट ला स्टार्टर मारला आणि ताई बसा लवकर म्हटले ,ताई पण तात्काळ जणू देव च गरजेला धावून आला अश्या केविलवान्या नजरेने बघट पटकन बाळाला घेऊन मागे बसल्या आणि आधार हॉस्पिटलमध्ये त्यांना सुखरूप सोडून परत पोलीस कॉन्स्टेबल राहुल साळुंखे आपल्या ड्युटी वर हजर झाले 

हे सगळं एवढं अस घडले की बघणारे ही स्तब्ध झाले जणू ,,,, या वर्दीतील देवमाणसाला मनाचा मुजरा

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात