शेतकऱ्याची अडवणूक होत असेल तर कारवाई केली जाईल
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील मुख्य अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आढावा बैठक झाली. जिल्हाधिकार्यांपासून ते गावपातळीवरील आशा वर्कर, पोलिसांसह सर्वच यंत्रणांनी संकटाच्या काळात उत्कृष्ट काम केले. मी स्वतः जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसह प्रशासनाच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.
कोरोना विषाणूच्या संसर्गाचे संकट जगापुढे उभे असून यामुळे संचारबंदी व जमावबंदी या कालावधीत नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंची उपलब्धता होण्याबरोबरच जिल्ह्यातील शेतातील शेतीमाल देखील जनतेपर्यंत पोहोचवता येईल व शेतकऱ्याला नुकसानीपासून वाचवता येईल याचा विचार करून निर्णय घेतले जातील.
शेतकऱ्याला शेतीमाल विकण्यासाठी आवश्यक त्या सहकार्याचे प्रशासनाचे धोरण राहील. ट्रॅक्टर हार्वेस्टर व वाहनांना इंधन दिले जाईल. शेतकऱ्याची अडवणूक होत असेल तर कारवाई केली जाईल. रेशन दुकानदारांमार्फत प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत धान्य पोहोचवण्यासाठी सक्षमतेने उपाययोजना केल्या जातील.