राज्यातील १८८ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी
आज २१० नवीन रुग्णांचे निदान; राज्यातील एकूण रुग्णसंख्या १५७४ - आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती
राज्यात आज कोरोनाच्या २१० नवीन रुग्णांची नोंद झाली. एकूण रुग्ण संख्या १५७४ झाली आहे. कोरोनाबाधित १८८ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात ११७६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३३ हजार ९३ नमुन्यांपैकी ३० हजार ४७७जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनाकरिता निगेटिव्ह आले आहेत तर १५७४ जण पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत १८८ कोरोना बाधित रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात ३८ हजार ९२७ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून ४७३८ जण संस्थात्मक क्वारंटाईन मध्ये आहेत.