ताजी बातमी

सहकारी संस्थांना कोविड-१९ च्या प्रतिबंधक उपायांना आर्थिक मदत करण्यासाठी संघीय संस्थेच्या मान्यता प्रक्रियेत सूट- सहकार मंत्री बाळासाहेब पाटील


राज्यातील  कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन सर्व उपाययोजना करत आहे. सहकारी संस्थांनीसुद्धा मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड - १९ साठी सढळ हाताने मदत करावी, सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील कलम ६९ मधील तरतुदीनुसार अंशदान देण्यासाठी संघीय संस्थेची परवानगी घ्यावी लागते. या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर संघीय संस्थेची परवानगी घेण्याची आवश्यकता नाही. त्यामध्ये आता सहकारी संस्थांना सूट देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.  सहकारी संस्थांनी यासाठी भरीव मदत करावी असे आवाहन सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले आहे.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात