कोरोना रोखण्यासाठी दौलताबादच्या ‘संकल्प महिला समूहा’ची कृतिशीलता
कोणतेही संकट हे माणसातील लढण्याच्या शक्तीला प्रेरणा देणारे असते. अट एकच असते की तुम्ही त्या संकटाने विचलित न होता त्याला संधीच्या स्वरुपात पाहिले पाहिजे. मग त्या संकटातून तुमच्या लढण्याची क्षमता तर वाढतेच पण इतरांनाही ती सहाय्यक, प्रेरक ठरते. आज सगळं जग कोरोनाच्या संकटाला सामोरे जात आहे. यात प्रत्येक जण आपल्या परीने काही तरी योगदान देण्याचा प्रयत्न करत आहे. यामध्ये स्वतः कष्टाचे, काटकसरीचे संघर्षमय जीवन जगत असताना या संकटाच्या वेळी आपण आपल्या गावासाठी, लोकांसाठी काय करु शकतो, या माणुसकीच्या विचारातून मास्क तयार करुन गावकऱ्यांना मोफत मास्क देण्याचे काम करणाऱ्या औरंगाबाद जिल्ह्यातील दौलताबादच्या संकल्प स्वयं सहायता समूहातील महिला दखलपात्र ठरतात.