कोथळी विविध कार्यकारी सेवा सोसायटीतर्फे २१ हजार रुपयांचा सहायता निधी असलेला धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीसाठी स्वीकारला :आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर
कोरोनाच्या कठीण काळात राज्य सरकारला सहायता करण्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी तसेच मी देखील आवाहन केले होते. याच आवाहनाला प्रतिसाद देत आज कोथळी विविध कार्यकारी सेवा
सोसायटीतर्फे २१ हजार रुपयांचा सहायता निधी असलेला धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीसाठी स्वीकारला.
याप्रसंगी संस्थेचे चेअरमन श्री. धनगोंडा पाटील, व्हाईस चेअरमन श्री. अशोक बोरगावे, श्री. संजय नांदणे आणि सचिव श्री. मलगोंडा पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते.
तसेच यावेळी क्रांती सहकारी पतसंस्था यांच्यातर्फे देखील रुपये ११.०००/- चा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीसाठी स्वीकारला.
याप्रसंगी संस्थेचे चेअरमन श्री. देवगोंडा पाटील, व्हाईस चेअरमन श्री. दिलीप मगदूम, सचिव श्री. सुहास बुर्ले व इतर मान्यवर उपस्थित होते.