ताजी बातमी

पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या नाथ प्रतिष्ठान व मुंबई येथील वन रुपी क्लिनिकच्या माध्यमातून गेल्या ८ दिवसात परळी येथे घरोघरी नागरिकांचे केवळ १ रुपयात थर्मल टेस्टिंग करण्यात आले असून या माध्यमातून एकूण १ लाख १४ हजार नागरिकांची वैद्यकिय तपासणी करण्यात आली.


या पूर्ण तपासणीसाठी वन रुपी क्लिनिकच्या दहा डॉक्टर्सची टीम गेल्या आठ दिवसांपासून परळीत स्थित होती. या टेस्ट दरम्यान शहरात तापाचे ८५, सर्दी – खोकल्याचे ३४ तर अन्य किरकोळ आजाराचे २३ रुग्ण आढळून आले असून त्यांची माहिती येथील उपजिल्हा रुग्णालयांस कळविण्यात आली आहे; तसेच आवश्यकतेनुसार स्वॅब टेस्ट व अन्य वैद्यकीय उपचारांचा सल्ला देण्यात आला आहे.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात