राजस्थानातील कोटा येथे अडकलेल्या महाराष्ट्रातील १७८० विद्यार्थ्यांना परत आणण्याकरिता राज्य परिवहन मंडळाच्या ९२ बसेस: परिवहन मंत्री अनिल परब
राजस्थानातील कोटा येथे अडकलेल्या महाराष्ट्रातील १७८० विद्यार्थ्यांना परत आणण्याकरिता राज्य परिवहन मंडळाच्या ९२ बसेस दिनांक २९ एप्रिल २०२० रोजी धुळे येथून रवाना करण्यात येणार आहेत.
सदर प्रवास लांब पल्ल्याचा असल्याने प्रत्येक बसमध्ये दोन चालकांची नियुक्ती करण्यात आली असून ताफ्यात ब्रेक डाउन व्हॅनची सुविधा देखील पुरविण्यात आली आहे.
राज्य परिवहन कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याची योग्य काळजी घेत विद्यार्थ्यांना त्यांच्या जिल्ह्यात सोडण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
About The Reporter
The News Reporter works under the supervision of the News Director. The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for radio newscasts, produces in-depth radio features, and produces special reports as assigned.