जीवनावश्यक वस्तुंच्या किराणा किटचे मोफत वाटप
● बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांचा महत्त्वपूर्ण निर्णय
● होम क्वारंटाइन असलेल्या ऊसतोडणी मजुरांना मिळणार लाभ
● बीड जिल्हा परिषदेतून एक कोटी ४३ लाख रुपये निधी मंजूर
बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी ऊसतोडणी करून जिल्ह्यात परतलेल्या मजुरांसाठी महत्त्वपूर्ण व दिलासादायक निर्णय घेतला आहे. जिल्हा परिषदेच्या स्वनिधी मधून आता जिल्ह्यातील ऊसतोड मजुरांना २८ दिवसांच्या क्वारंटाईन कालावधीसाठी म्हणून जीवनावश्यक किराणा साहित्य मोफत वाटप करण्यात येणार आहे.
बीड जिल्हा परिषदेच्या स्वनिधी मधून यासाठी प्राथमिक स्वरूपात १ कोटी ४३ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला असून, ग्रामविकास विभागाने यास विशेष बाब म्हणून तांत्रिक मान्यताही दिली आहे.