ताजी बातमी

महाराष्ट्र राज्य स्थापनेचा हिरकमहोत्सवी वर्धापनदिन आणि जागतिक कामगार दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. संयुक्त महाराष्ट्राचा लढा महाराष्ट्रानं ज्या ताकदीनं लढवला त्याच ताकदीनं आज ‘कोरोना’विरुद्ध लढू आणि जिंकू, असा विश्वास उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात रस्त्यावर उतरुन संघर्ष केला होता, यावेळी प्रत्येकानं आपापल्या घरातंच थांबूनंच कोरोनाविरुद्ध लढायचं आहे, कोरोनाला हरवायचं आहे. त्यासाठी घराबाहेर पडू नका, रस्त्यावर येऊ नका, घरातंच रहा, सुरक्षित रहा, असं आवाहनही त्यांनी पुन्हा एकदा राज्यातील जनतेला केलं आहे.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात