खाकीत एकापेक्षा एक उत्तम कलाकार आहेत. कर्तव्यासोबत कला जोपासणारे पोलीस नाईक (बक्कल नं. 970722) संतोष देसाई यांच्या रूपात "खाकीतला चित्रकार" पाहावयास मिळाला
लॉकडाऊनच्या काळात घरात बसलेला प्रत्येक जण वैतावलेला आहे. काय करावे, या विचारने त्रस्त आहे. असाच विचार कोरोना बाधित चोरट्यामुळे कॉरन्टाईन झालेल्या पोना संतोष देसाई यांनाही आला अन् त्यांनी "कर्तव्याचा संदेश" देणारे चित्र रेखाटले.
संतोष देसाई हे मुंबईतील बांगुर नगर पोलीस ठाण्यात गुन्हे प्रकटीकरण पथकात कर्तव्याला आहेत. कोरोना संकटात कर्तव्य बजावताना बांगुर नगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने एका चोरट्याच्या मुसक्या आवळल्या. त्या चोरट्याची तपासणी केली असता त्याला कोरोनाची लागन झाल्याचे समोर आले अन् बांगुर नगर पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकासह 14 अधिकारी व पोलीस अंमलदार क्वॉरन्टाईन झाले. त्या 14 पोलिसांमध्ये पोलीस नाईक संतोष देसाई हे देखील होते.
संतोष देसाई यांनी यापूर्वीही अनेक चित्र, भव्यदिव्य सजावटी केल्या आहेत.
खाकीतली कला इतरांनाही समजण्यासाठी जरूर शेअर करा आणि घरात राहा, सुरक्षित राहा