पुढील आदेशापर्यंत नाशिक शहरातील मद्य विक्री दुकाने बंद राहतील: सुरज मांढरे जिल्हाधिकारी
सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करून रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये मद्य विक्रीस शासनाने परिपत्रकाद्वारे 3 मे 2020 रोजी परवानगी दिली. नाशिक शहर रेड झोनमध्ये असूनही मद्यविक्री दुकाने सुरू करण्यात आली. परंतु बऱ्याच मद्य विक्री दुकानांवर सुरक्षित वावराच्या नियमांना पायदळी तुडवत मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली. यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन पोलिसांना मनुष्यबळाचा वापर करावा लागला. म्हणून पुढील आदेशापर्यंत नाशिक शहरातील मद्य विक्री दुकाने बंद राहतील. तसेच आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित दुकानांचे परवाना रद्द करण्यात येईल, तसेच सवलतींचा अतिवापर झाल्यास त्या बंद करणे क्रमप्राप्त ठरणार आहे, असे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी कळविले आहे..