ऑपरेशन ब्लॅकफेस : बाल पोर्नोग्राफीविरोधी मोहीम - गृहमंत्री अनिल देशमुख
जानेवारीच्या मध्यापासून ऑपरेशन ब्लॅकफेस या मोहिमेअंतर्गत आम्ही बाल पोर्नोग्राफीत अडकलेले, तसेच बालकांवर लैंगिक अत्याचार करणारे, त्याचप्रमाणे बाल पोर्नोग्राफीच्या व्यसनाधीन झालेल्या व्यक्तींवर नजर ठेवून आहोत. महाराष्ट्र सायबर विभाग ही कारवाई करत आहे. बाल पोर्नोग्राफी ही समाजाला लागलेली एक कीड आहे. अतिशय विकृत आणि किळसवाणा असलेला हा प्रकार.. याच्या विरोधात गृह विभाग अतिशय कठोर पाऊल उचलत असून हे विकृत आता यापुढे जास्त काळ मोकळे राहणार नाहीत. यांच्यावर आमची नजर असून लवकरच हे गुन्हेगार आपल्याला गजाआड म्हणजे तुरुंगात गेलेले पाहायला मिळतील.
About The Reporter
The News Reporter works under the supervision of the News Director. The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for radio newscasts, produces in-depth radio features, and produces special reports as assigned.