ताजी बातमी

● वैद्यकीय तपासणी करुन प्रशासनाने पुरविल्या विविध सुविधा


● साईनगर शिर्डी येथून चौथी रेल्वे उत्तर प्रदेशकडे रवाना


कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अडकून पडलेल्या राहाता, संगमनेर आणि कोपरगांव तालुक्यातील उत्तर प्रदेश राज्यातील १५१९ कामगार व त्यांचे कुटुंबिय आज साईनगर शिर्डी रेल्वेस्थानकावरुन विशेष रेल्वेने उत्तर प्रदेशातील लखीमपूर जिल्ह्याकडे रवाना झाले. यापैकी १ हजार ४०४ प्रौढ कामगारांचे रेल्वे प्रवासाप्रित्यर्थ रुपये ६७५ प्रमाणे एकूण ९ लाख ४७ हजार ७०० एवढे भाडे महाराष्ट्र शासनातर्फे अदा करण्यात आले आहे. रोजगारानिमित्त हे सर्व जण उपरोक्त तीन तालुक्यात वास्तव्यास होते. या कामगारांना उत्तर प्रदेशातील उन्नाव, सीतापूर व बस्ती येथे पोहोचविण्यात येणार आहे. साईनगर शिर्डी येथून आज चौथी रेल्वे सोडण्यात आली असून तिन्ही तालुक्यातील परप्रांतीय कामगारांना उत्तर प्रदेशकडे नेणारी पहिलीच रेल्वे होती.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात