ताजी बातमी

राज्याचे जलसंपदा मंत्री आणि सांगलीचे पालकमंत्री ना. जयंत पाटील यांनी आज सांगलीतून २ कोटी ५२ लाख २६ हजार ३९४ रुपयांचे धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मा. मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केले.


यावेळी मा. उपमुख्यमंत्री ना. अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. अशोक चव्हाण उपस्थित होते. या मदतीमध्ये सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीने २ कोटी २५ लाख रुपये, राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना यांच्यावतीने १२ लाख ७६ हजार ३९४ रुपये, राजारामबापू सहकारी बँकेच्यावतीने १४ लाख ५० हजार रुपये आदी धनादेशांचा समावेश होता.

सांगली जिल्हयातून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मदतीचे धनादेश दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी मदत दिलेल्या संस्थांचे आभार मानले आहेत.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात