ताजी बातमी

लहान असो वा वयस्क सर्वांचाच कोरोनाने पिच्छा पुरविला आहे. मोठ्या शहरांमध्ये, तर कोरोनाचे साम्राज्य आहे. अशा परिस्थितीत मलकापूर तालुक्यातील नरवेल येथील पाच वर्षाच्या ‘गुडिया’ ने कोरोनाशी चिवट झुंज दिली. मुंबई येथून गावाकडे आल्यानंतर कोरोना पॉझिटिव्ह आढळलेली ही मुलगी बुलडाणा येथे कोविड केअर सेंटरला दाखल होती.

या गुडियाने कोरोनावर मात करीत आज सर्वांना सुखद धक्का दिला. ही गुडिया आनंदाच्या भावमुद्रेत सेंटरच्या बाहेर पडली व टाळ्या वाजवून उपस्थितांनी तिचे स्वागत केले.  गुडियाच्या सुट्टीमुळे मलकापूर तालुक्यातून कोरोनाला हद्दपार करण्यात यश आले आहे.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात