ताजी बातमी

सांगली,  : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून देशभर लॉकडाऊन जारी आहे. लॉकडाऊनमुळे सांगली जिल्ह्यातील अनेक व्यक्ती राज्याबाहेर व राज्यातील अन्य जिल्ह्यात अडकून पडल्या आहेत. तसेच सांगली जिल्ह्यातही अन्य जिल्ह्यातील व राज्याबाहेरील व्यक्ती अडकून पडल्या आहेत. या व्यक्तींना त्यांच्या स्वगृही जाता यावे यासाठी शासनाच्या वतीने अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यानूसार दिनांक 26 मे पर्यंत सांगली जिल्ह्यातून राज्याबाहेर व  अन्य जिल्ह्यात 1 लाख 3 हजार 793 व्यक्ती जिल्ह्याबाहेर गेल्या असून सांगली जिल्ह्यात राज्याबाहेरून व राज्यातील अन्य जिल्ह्यातून 46 हजार 222  व्यक्ती आल्या आहेत. अशा येणाऱ्या व जाणाऱ्या व्यक्तींची एकूण संख्या 1 लाख 50 हजार 15 इतकी आहे. अशी माहिती अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम यांनी दिली.

यामध्ये सांगली जिल्ह्यातून राज्याबाहेर जाणाऱ्या 34 हजार 373 व्यक्ती आहेत तर राज्यातील अन्य जिल्ह्यात जाणाऱ्या 69 हजार 420 व्यक्ती आहेत. सांगली जिल्ह्यात राज्याबाहेरून आलेल्या 10 हजार 835 व्यक्ती आहेत तर राज्यातील अन्य जिल्ह्यातून आलेल्या 35 हजार 387 व्यक्तींचा समावेश आहे.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात