ताजी बातमी

वाशिम येथे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात  Covid19  च्या अनुषंगाने उद्भवलेली परिस्थिती आणि कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला. जिल्हा प्रशासनाने प्रभावीपणे प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्याने जिल्ह्यात समाधानकारक परिस्थिती आहे. भविष्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने अधिक दक्ष राहून काम करावे. ताप, सर्दी, खोकला यासारखी लक्षणे आढळणाऱ्या व्यक्तींना तातडीने आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्यावी. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या ‘फिव्हर क्लिनिक’मध्ये आवश्यक मनुष्यबळ व सामग्री उपलब्ध करून द्यावी. जेणेकरून ग्रामीण भागातील नागरिकांना लवकरात लवकर उपचार मिळणे शक्य होईल. तसेच कोविड हेल्थ सेंटर, डेडीकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार सर्व आरोग्य विषयक सुविधा सज्ज ठेवण्याबाबत प्रशासनाला सूचना दिल्या.


बैठकीत जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे जी, खासदार भावना गवळी जी, आमदार राजेंद्र पाटणी जी, आमदार अमित झनक जी यांनीही आपल्या सूचना मांडल्या. यावेळी जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, सहाय्यक जिल्हाधिकारी वैभव वाघमारे, सहाय्यक पोलीस अधीक्षक पवनकुमार बन्सोड, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, अपर पोलीस अधीक्षक विजयकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबादास सोनटक्के, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, जिल्हा पुरवठा अधिकारी राजेंद्र जाधव उपस्थित होते.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात