ताजी बातमी

सिडकोच्या विविध ऑनलाइन सेवा आता एकाच पोर्टलच्या माध्यमातून उपलब्ध


*"संवाद सिटीझन पोर्टल हे डिजिटायझेशन व सिटीझन्स फ्रेंडली कामकाजाच्या दिशेने सिडकोचे आणखीन एक महत्त्वाकांक्षी पाऊल असून सिडकोच्या सर्व ऑनलाइन सेवा आता या पोर्टलच्या माध्यमातून एकत्रितरीत्या, एकाच ठिकाणी, एका क्लिकवर घर बसल्या उपलब्ध होणार असून याचा नागरिकांना लॉकडाऊनच्या काळात नक्कीच फायदा होणार आहे" असे उद्गार सिडकोच्या संवाद सिटीझन पोर्टलचा ऑनलाइन माध्यमातून शुभारंभ करताना श्री. लोकेश चंद्र, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक यांनी काढले.* सदर पोर्टलचा शुभारंभ दिनांक १ जून २०२० रोजी श्री. लोकेश चंद्र यांच्या शुभहस्ते झाले. सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर संवाद सिटीझन पोर्टलच्या अनावरणाचा कार्यक्रम हा संपूर्णत: ऑनलाइन माध्यमातून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे पार पडला.   


या प्रसंगी श्री. अश्विन मुद्गल, सहव्यवस्थापकीय संचालक – १, डॉ. प्रशांत नारनवरे, सहव्यवस्थापकीय संचालक - २, श्री. अशोक शिनगारे, सहव्यवस्थापकीय संचालक - ३, श्री. निसार तांबोली, मुख्य दक्षता अधिकारी व आणि सिडकोतील सर्व विभाग प्रमुख ऑनलाइन माध्यमातून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित होते. 


सिडको महामंडळाने यापूर्वीच काळाची पावले ओळखून ई-प्रशानाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आपल्या बहुतांश सेवांचे डिजिटलीकरण करून या सेवा ऑनलाइन उपलब्ध करून दिल्या आहेत. या सेवांमध्ये ऑनलाइन आरटीआय (माहिती अधिकार), ऑनलाइन तक्रार निवारण, ऑनलाइन पेमेन्ट गेटवे, वसाहत विभागाच्या विविध सेवा, पाणी देयक भरणा, सेवा शुल्क, दक्षता विभागातर्फे देण्यात येणाऱ्या सेवा इ. सेवांचा समावेश आहे. ऑनलाइन सेवांमुळे या सेवांशी संबंधित प्रक्रिया अधिक जलद व पारदर्शक रीतीने पार पडून अंतिमत: याचा लाभ नागरिकांना मिळत आहे. 


यापूर्वी विविध ऑनलाइन सेवांसाठी नागरिकांना स्वतंत्ररीत्या लॉग इन करावे लागत असे. परंतु संवाद सिटीझन पोर्टलमुळे केवळ एकदाच सुरूवातील नोंदणीकरण (Registration) करून सदर लॉग इन च्या माध्यमातून या सर्व सेवा नागरिकांना उपलब्ध होणार आहेत. नागरिकांना सिडको कार्यालय किंवा विभागीय कार्यालयांमध्ये न जाता, घरबसल्या केवळ एका क्लिकवर या सर्व ऑनलाइन सेवांचा लाभ या पोर्टलमुळे घेता येणार आहे. 


यापूर्वी प्रत्येक स्वतंत्र ऑनलाइन सेवेसाठी उपलब्ध असणाऱ्या सुविधा जसे, अर्जाची स्थिती जाणून घेणे, ऑनलाइन शुल्क भरणा इ. या पोर्टलमध्येही समाविष्ट करण्यात आल्या आहेत. लॉकडाऊनच्या या कठीण काळात सिडकोतर्फे सुरू करण्यात आलेल्या या “वन स्टॉप” पोर्टलमुळे नागरिकांना नक्कीच दिलासा प्राप्त होणार आहे.


प्रिया रातांबे

जनसंपर्क अधिकारी, सिडको

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात