धारावी पोलीस ठाणे
दिनांक 08/07/2020 रोजी 13.47 वा. च्या पूर्वी धारावी पोलिस ठाणे हद्दीतील रूम नं. 249 च्या समोर, हनुमान चौक, धारावी मुंबई या ठिकाणी यातील मयत इसम नामे कौशिक सुनील नारायण कर , वय 17 वर्ष, पत्ता- रूम नं. अे 257, न्यू मुन्सिपल चाळ नं.03 च्य मागे, सुभाष नगर, धारावी यास कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरून धारधार शस्त्राने छातीच्या उजव्या बाजूस कॉलर बोन खाली भोसकून खोल गंभीर जखम केली व डाव्या हाताच्या मनगटावर साध्या जखमा केल्याने जास्त प्रमाणात रक्तस्त्राव झाला. त्यास उपचारासाठी सायन रुग्णालय येथे दाखल केले असता उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यास मयत घोषित केले आहे.
सदर बाबत *गु.र.क्र. 279/2020 कलम 302 भा.दं.वि.* अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून अधिक तपास चालू आहे.