ताजी बातमी

सांगली जिल्ह्यात पुन्हा लॉकडाउन सुरू करण्याच्या मनस्थितीत आम्ही नव्हतो. मात्र काही भागात जास्त रुग्ण वाढत आहेत, त्यामुळे नाईलाजाने जिल्ह्यात लॉकडाऊन घोषित करत आहोत. आतापर्यंत केलेल्या लॉकडाऊनच्या घोषणेला नागरिकांनी सहकार्य केले आहे यापुढेही कराल ही अपेक्षा करतो.


२२ जुलै रोजी रात्री १० वाजता लॉकडाऊन सुरू होणार आहे. ३० जुलै रोजी रात्री १० वाजेपर्यंत हा लॉकडाऊन सुरू राहणार आहे. सांगली मिरज सारख्या मनपा, नगरपालिका, नगरपंचायत या भागात कडक लॉकडाऊन लागू केला जाईल तर ग्रामीण भागातील लोकांनी जनता कर्फ्यू पाळावा.


सांगली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून लॉकडाउन संदर्भातील सविस्तर माहिती दिली जाईल. योग्य नियमावली जाहीर केली जाईल. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आम्हाला हा सक्तीचा निर्णय घ्यावा लागला आहे. आपल्या जिल्ह्यातील लोकांच्या स्वास्थ्यासाठी सर्वांनी कटाक्षाने नियम पाळावेत.


येत्या काही दिवसात रुग्णांची संख्या अधिक वाढण्याची शक्यता आहे. त्यासाठी सांगली जिल्हा प्रशासन व आरोग्य प्रशासन सज्ज आहे. कोविड सेंटर येथे रुग्णांच्या आहाराची दुरावस्था होत असल्याची तक्रार काही ठिकाणाहून येत आहे. याबाबत प्रशासनाला तत्काळ योग्य व्यवस्था करण्याचे निर्देश दिलेत.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात