ताजी बातमी

वर्धा:  जिल्ह्यात आज  4 कोरोना रुग्णांची भर पडली असून एका महिलेचा मृत्यू झाला आहे तर एका व्यक्तीने कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 83 झाली असून एकूण ऍक्टिव्ह रुग्ण 37 आहेत. 

4 कोरोना बाधित रुग्ण हे  वर्धा शहरातील टिळक चौकातील  दोन महिला वय 54 वर्ष , 28 वर्ष तसेच काकडा येथील  दोन वृद्ध पुरुष वय 70 व 74 वर्षे  यांचे कोरोनाबाधित असल्याचे निदान झाले. आज पॉझिटिव्ह चाचणी आलेल्या टिळक चौकातील 54 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. सेवाग्राम रुग्नालयात दाखल महिलेला मधुमेह, उच्च रक्तदाब, उच्च थायराईड हे  आजार सुद्धा होते. आजच्या  कोरोना बाधित रुग्णासहित जिल्ह्यात एकूण रुगणांची संख्या 83 झाली असून 44  रुग्ण कोरोनामुक्त  झाले आहेत तसेच ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 37 आहे. 

प्रयोगशालेय तपासण्या 

 जिल्ह्यात  आतापर्यंत 6  हजार 720 कोरोना चाचणी करण्यात आली असून त्यापैकी 6 हजार 579 अहवाल प्राप्त झाले आहेत. यात 6 हजार 469 निगेटिव्ह तर 83  पॉझिटिव्ह आहेत, तसेच 141 अहवाल प्रलंबित आहेत. आज 177 स्त्राव नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून आयसोलेशन मध्ये  187 व्यक्ती आहेत. 


गृह विलगिकरण  

65 हजार 41 व्यक्तींना आजपर्यंत गृह विलगिकरण करण्यात आले आहे.  त्यापैकी 58 हजार 335 व्यक्तींचा गृहवीलगिकरण कालावधी संपला असून 6706 व्यक्ती आज गृहवीलगिकरणात आहेत.तसेच 242 व्यक्ती संस्थात्मक विलगिकरणात   आहेत.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात