वाशीम जिल्ह्यात ११ बाधितांची वाढ; २७ जणांना डिस्चार्ज
आज दुपारी प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यात आणखी ६ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. यामध्ये वाशिम शहरातील नवोदय विद्यालय परिसरातील ३० वर्षीय पुरुष, कारंजा लाड शहरातील शांती नगर परिसरातील ३० वर्षीय महिला, वापटी-कुपटी (ता. कारंजा लाड) येथील ३२ वर्षीय पुरुष, मालेगाव शहरातील गांधी नगर परिसरातील ३२ वर्षीय महिला व १० वर्षीय मुलगा, नांदगाव (ता. मंगरूळपीर) येथील २२ वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे. तसेच जिल्ह्याबाहेर ५ रुग्णांची वाढ झाली असून त्याची नोंदही आज घेण्यात येत आहे.
दरम्यान, वाशिम तालुक्यातील ६, मंगरूळपीर तालुक्यातील ०६, कारंजा लाड तालुक्यातील १ आणि रिसोड तालुक्यातील १४ व्यक्तींना उपचारानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
सद्यस्थिती
एकूण पॉझिटिव्ह – ४३२
ऍक्टिव्ह – १८८
डिस्चार्ज – २३५
मृत्यू – ९