ताजी बातमी

चेंबूर येथील महात्मा फुले नगर (फाईनआर्ट सोसायटी हॉल च्या बाजूला ) 

आर.सी. मार्ग येथे आज सकाळी १०:३० वा एका घराची गॅलरी पडून तुळसाबाई वामन अंभोरे वय वर्ष ६५ या गंभीर जखमी झाल्या असून त्यांना राजावाडी रुग्णालय मध्ये तत्काळ दाखल करण्यात आले .घटनेची माहिती मिळताच समाजसेवक सुभाष मराठे यांनी भेट देऊन मदत कार्य सुरू केले.

सन २०११ पासून येथील SRA प्रोजेक्ट रखडल्यामुळेच घरे जीर्ण होऊन अपघात झाल्याचा आरोप करत संबंधित विकासकाकडे श्रीमती तुळसाबाई अंभोरे यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करून त्यांचा निवारा उभा करून देण्याची मागणी नगरसेविका  सौ आशाताई सुभाष मराठे यांनी केली आहे.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात