ताजी बातमी

रिसोर्ट-हॉटेल सुरू झालीत, मॉल सुरू झाले पण राज्य सरकारने मंदिर अद्याप काही सुरू केली नाहीत. कोविडच्या काळात सुरक्षित अंतर ठेवून व त्यांची योग्य नियमावली बनवून मंदिरे उघडण्यासाठी राज्य सरकारला सुबुद्धी देवो यासाठी मनसे नेते बाळा नांदगावकर  रविवार दि.१३ सप्टेंबर २०२० रोजी सकाळी १०.०० वाजता बाबांची चावडी, शिर्डी येथे श्री साईबाबांच्या चरणी डोकं टेकून राज्यातील मंदिरे उघडण्यासाठी साकडं घालणार आहेत.

तसेच शिर्डी संस्थानने गेल्या चार महिन्यांपासून कंत्राटी कामगारांना पगारच दिलेला नाही, तसेच शिर्डी संस्थानमधील सर्व कर्मचा-यांची ४० टक्के पगार कपात केली आहे यासंदर्भात सरकारकडे मागणी करण्यात येणार आहे.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात