ताजी बातमी

‌वाको महाराष्ट्र किक बॉक्सिंग असोसिएशन यांच्या वतीने पिंपरी चिंचवड , पुणे येथे रविवारी 27 डिसेंबर 2020 दरम्यान राज्यस्तरीय  किक बॉक्सिंग कपचे आयोजन करण्यात आले आहे.  या स्पर्धेमध्ये पनवेल  मधून  कुमारी. समिक्षा कायंदेकर, आणि  कु.वेदांत कायंदेकर  या खेळाडूनी  सहभाग घेतला.

    कुमारी समिक्षा कायंदेकर (एल्फिन्स्टन कॉलेज फोर्ट) आणि वेदांत कायंदेकर (आय,सी,एल,मोतीलाल झुंणझुणवाला कॉलेज, नवी मुंबई) यांनी   पॉईंट फाईट मध्ये सुवर्णपदकाला गवसणी घातली.                                         या स्पर्धेत 250 पेक्षा जास्त खेळाडूंनी भाग घेतला.   

     

      समिक्षा आणि वेदांतचा सत्कार महाराष्ट्र वाको असोसिएशनचे अध्यक्ष श्री संतोष म्हात्रे सर आणि युनायटेड शोतोकान कराटे असोसिएशन या संस्थेचे मार्गदर्शक , अध्यक्ष व महाराष्ट्र वाको असोसिएशन चे उपाध्यक्ष डॉ. मंदार पनवेलकर सर, यांच्या हस्ते झाला.                   तसेच कॉलेज च्या प्रिन्सिपॉल डॉ. पूनम सिंग आणि मॅनेजमेंट चा पाठिंबा मिळाला.

     या दोघांची निवड पुढे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी झाली आहे.

                     या सर्व खेळाडूना  युनायटेड शोतोकान कराटे असोसिएशन या संस्थेचे मार्गदर्शक , अध्यक्ष व महाराष्ट्र वाको असोसिएशन चे उपाध्यक्ष डॉ. मंदार पनवेलकर सर, श्री, निलेश भोसले सर , श्री पियुष सदावर्ते सर श्री प्रशांत गांगुर्डे सर , आणि प्रतिक कारंडे यांचे  प्रशिक्षण आणि मार्गदर्शन लाभले.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात