ताजी बातमी

जालना  -- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जंयतीनिमित सामाजिक समता कार्यक्रमा अंतर्गत आज सहायक आयुक्त, समाज कल्याण, कार्यालयातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन येथे जेष्ठ नागरिकांसाठी चर्चासत्र तसेच आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिर पार पडले.

सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लक्ष्मीकांत कंकाळ हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ नागरिक मंचाचे रविप्रकाश उजवणे,  प्रा. रावसाहेब ढवळे,  धर्मा खिलारे,  सेवानिवृत उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रकांत दिलपाक आदी उपस्थित होते.  प्रमुख वक्त्या प्रा. रेणुका बडवणे  आणि ज्येष्ट नागरिकांनी  यावेळी मार्गदर्शन केले.  प्रास्ताविक सहायक आयुक्त, समाज कल्याण अमित घवले यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. कैलास राठोड  यांनी केले .

यावेळी जेष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच  जनकल्याण रक्तपेढी यांच्या सहकार्याने आयोजित रक्तदान शिबिरात अमित घवले,  दत्तात्रय वाघ,  श्री. चाबुकस्वार, हरिदास भोपळे,  रमेश गजर आदींसह शासकीय वसतीगृहातील बी.व्ही.जी.कंपनीचे बाहयस्त्रोत कर्मचारी असे एकुण वीस पुरुष व महिला कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात