ताजी बातमी

दिनांक १ नोव्हेंबर २०२५ रोजी रिपब्लिकन पक्ष (खोरीपा) च्या केंद्रीय कार्यालयात, सर्व कार्यकर्त्यांच्या सहमतीने आणि उपस्थितीत, प्रकाश भास्कर केदारे यांची रिपब्लिकन कामगार आघाडीच्या मुंबई प्रदेश अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.

ही नियुक्ती रिपब्लिकन पक्ष (खोरीपा) चे राष्ट्रीय अध्यक्ष सन्मानीय देशक भाऊ खोब्रागडे यांच्या आदेशानुसार आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सन्मानीय सुनिल भाऊ निरभवने यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

सदर प्रसंगी प्रदेश उपाध्यक्ष विनोद जी साळवी, मुंबई प्रदेश अध्यक्ष सन्मानीय भागवत जी कांबळे, मुंबई उपाध्यक्ष सन्मानीय सलीम सैय्यद जी, मुंबई सरचिटणीस सन्मानीय विक्रांत जी पाटील, तसेच पक्षाचे अनेक वरिष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रकाश भास्कर केदारे हे समाजकारण, कामगार हक्क आणि संघटनात्मक बांधणी या क्षेत्रात दीर्घकाळ सक्रिय असून, त्यांच्या नेतृत्वामुळे मुंबईतील रिपब्लिकन कामगार आघाडीच्या संघटनात्मक कार्याला नवी दिशा आणि गती मिळेल, असा विश्वास पक्ष नेतृत्वाने व्यक्त केला आहे.

या प्रसंगी श्री. केदारे यांनी सांगितले की, “पक्षाच्या तत्त्वनिष्ठ विचारसरणीवर आधारित संघटन मजबूत करणे, कामगारांच्या न्याय्य मागण्यांसाठी ठोस भूमिका घेणे आणि समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत रिपब्लिकन विचार पोहोचविणे हेच माझे प्राधान्य असेल.”

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात