ताजी बातमी

सायन कोळीवाडा विधानसभा क्षेत्रातील वॉर्ड क्रमांक १७५ मध्ये अत्यंत महत्त्वाच्या रावळी मॅटर्निटी रोडच्या काँक्रीटीकरणासह रस्त्यालगतच्या ड्रेनेज लाईन उभारणीच्या कामांचे भूमिपूजन आज आमदार कॅप्टन तामिळ सेल्वन यांच्या निधीतून संपन्न झाले.

स्थानिक नागरिकांच्या दीर्घकाळच्या मागणीनुसार सुरू झालेल्या या विकासकामांमुळे परिसरातील वाहतूक व्यवस्था अधिक सुरळीत होणार आहे तसेच पावसाळ्यात पाणी साचण्याची समस्या दूर होणार आहे.

या कार्यक्रमास विविध पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक उपस्थित होते.

विकासकामांना नेहमीच प्राधान्य देणारे “जनतेचा उत्तम सेवक” म्हणून ओळखले जाणारे आमदार कॅप्टन तामिळ सेल्वन यांच्या पुढाकारामुळे या भागातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

स्थानिकांच्या मूलभूत गरजा व सोयीसुविधांसाठी सातत्याने काम करणाऱ्या आमदारांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात