मिशन मँग्रोज : मुंबईच्या पर्यावरणरक्षणासाठी मा. खासदार राहुल शेवाळे यांचे प्रेरणादायी नेतृत्व!
मुंबई | शहराच्या पर्यावरणीय संतुलनासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या कांदळवनांचे संरक्षण व पुनरुज्जीवन करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या ‘मिशन मँग्रोज’ अभियानाला आज मोठी गती मिळाली. चेंबूरच्या छेडा नगर परिसरातील नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या खारफुटीचे संवर्धन करण्यासाठी सुमारे 2000 नवीन खारफुटी रोपांची लागवड करण्यात आली.
या उपक्रमात शिवसेना उपनेते व मा. खासदार राहुल शेवाळे यांनी स्वतः उपस्थित राहून रोपांची लागवड केली आणि पर्यावरण संरक्षणाचा दृढ संकल्प पुन्हा अधोरेखित केला. त्यांच्यासोबत वन विभागाचे अधिकारी तसेच छेडा नगर रेसिडेंट्स असोसिएशनचे पदाधिकारी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले.
मा. खासदार राहुल शेवाळे यांनी यावेळी बोलताना सांगितले की,
“मुंबईचे पर्यावरण वाचवण्यासाठी मँग्रोज हे संरक्षक कवच आहेत. नागरिकांच्या सहभागातून आणि शासकीय यंत्रणांच्या सहकार्याने आम्ही हा अभियान अधिक व्यापक करू. लोकांसाठी, लोकांच्या मदतीने पर्यावरण संवर्धनाचे हे मिशन आपण सर्वांनी मिळून पुढे न्यायचे आहे.”
त्यांच्या पुढाकारामुळे ‘मिशन मँग्रोज’ हे फक्त एक उपक्रम न राहता लोकहिताचे जनअभियान बनत आहे. भविष्यात लोकसभा मतदारसंघातील इतर भागांमध्येही कांदळवनांचे संरक्षण, पुनरुज्जीवन व स्वच्छता उपक्रम राबवून या मोहिमेची व्याप्ती आणखी वाढविण्याचा निर्धार मा. शेवाळे यांनी व्यक्त केला.
मुंबईच्या भविष्यासाठी हिरवळ वाढविण्याचा आणि नैसर्गिक संपत्तीचे रक्षण करण्याचा हा दूरदर्शी प्रयत्न…
जनतेला प्रेरणा देणारा, पर्यावरणाला बळ देणारा!