ताजी बातमी

आरोग्य सेवा आयुक्तालयात आज अनेक दिवस प्रलंबित असलेल्या सेवाखंड क्षमापनासंदर्भातील आदेशपत्रांचे वितरण करण्यात आले. यामध्ये १५० वैद्यकीय अधिकाऱ्यांना अस्थायी सेवेतून स्थायी सेवेत रूपांतरित करणारी प्रमाणपत्रे देण्यात आली. उर्वरित अधिकाऱ्यांची आदेशपत्रे पुढील आठवड्यात दिली जाणार आहेत.

या प्रसंगी ‘डॉक्टर हा आरोग्य व्यवस्थेचा प्रमुख आधारस्तंभ आहे’ यावर विशेष भर देण्यात आला. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या विनंती बदल्या प्रक्रियेत पूर्ण पारदर्शकता पाळली जात असल्याने अनावश्यक पाठपुरावा करण्याची गरज नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

आदिवासी व अतिदुर्गम भागांत कार्यरत डॉक्टरांच्या वेतनवाढीसंदर्भातील प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला असून ग्रामीण भागातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना किमान प्रोत्साहन भत्ता मिळावा यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले. डॉक्टरांच्या मानधनवाढीबाबतचा निर्णय पुढील टप्प्यात होणार आहे.

कार्यक्रमाला डॉ. भालेराव, डॉ. केंद्रे यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात