ताजी बातमी





मुंबईतील परळ येथील के ई एम रुग्णालयात क्रीडा क्षेत्रातील दुखापतग्रस्त खेळाडूंसाठी अत्याधुनिक उपचार व पुनर्वसन केंद्र सुरू करण्यात आले आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या या उपक्रमामुळे शासकीय रुग्णालयांमध्ये क्रीडापटूंना खास वैद्यकीय सुविधा देणारे केईएम हे पहिले रुग्णालय ठरले आहे.

या केंद्रात आर्थोस्कोपी शस्त्रक्रिया, फिजिओथेरपी, मानसोपचार, आहार सल्ला व पुनर्वसन अशा सर्व सुविधा एकाच छत्राखाली उपलब्ध असून २० रुग्णशय्यांचा विशेष कक्षही उभारण्यात आला आहे. अत्याधुनिक यंत्रसामग्रीमुळे क्रीडापटूंना जलद व प्रभावी उपचार मिळणार असून खेळाडूंच्या उज्ज्वल भविष्यासाठी हे केंद्र प्रेरणादायी ठरणार आहे.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात