ताजी बातमी

नववर्षाचे आगमन, उत्सव आणि ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर राज्यातील नागरिकांच्या आरोग्याच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येणार असल्याचे अन्न व औषध प्रशासन तसेच विशेष सहाय्य विभागाचे मंत्री नरहरी झिरवाळ यांनी स्पष्ट केले आहे.

हॉटेल्स, उपहारगृहे व सर्व प्रकारच्या खाद्य आस्थापनांमध्ये तयार होणारे अन्न स्वच्छ, सुरक्षित व निर्भेळ असणे अत्यावश्यक असून, यासाठी अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील रेस्टॉरंट्स, हॉटेल्स व खाद्य आस्थापनांची सखोल व काटेकोर तपासणी करावी, असे स्पष्ट निर्देश मंत्री झिरवाळ यांनी दिले.

नागरिकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा देत अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर कठोर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.

दरम्यान, उत्तम स्वच्छता व उच्च अन्नसुरक्षा मानकांचे पालन करणाऱ्या हॉटेल आस्थापनांना प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हा व राज्यस्तरावर उत्कृष्ट हॉटेल्सना पुरस्कार देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

 २६ जानेवारी २०२६ रोजी जिल्हास्तरावरील पुरस्कार संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार असून,

 राज्यस्तरावर उत्कृष्ट ठरलेल्या हॉटेल्सचा सन्मान मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिली.

या निर्णयामुळे एकीकडे नागरिकांना सुरक्षित व दर्जेदार अन्न मिळणार असून, दुसरीकडे नियमांचे काटेकोर पालन करणाऱ्या हॉटेल व्यावसायिकांना शासकीय पातळीवर सन्मान मिळणार आहे.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात