ताजी बातमी

नागरिक सेवांना अधिक गतिमान, पारदर्शक आणि सुलभ बनवण्याच्या दिशेने झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, बृहन्मुंबई (SRA) यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित ‘मित्र वाणी’ चॅटबॉट सेवा सुरू केली आहे. ही अत्याधुनिक सेवा नागरिकांच्या प्रश्नांना प्रभावी आणि वेळेत उत्तरे देण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.

‘मित्र वाणी’ चॅटबॉटच्या माध्यमातून झोपडपट्टी पुनर्वसन योजनांबाबतची माहिती, अर्जांची स्थिती, पात्रता, आवश्यक कागदपत्रे, प्रक्रिया व तक्रार निवारण यासंबंधी प्रश्नांना नागरिकांना त्वरित प्रतिसाद मिळणार आहे. विशेष म्हणजे ही सेवा २४ तास उपलब्ध असल्याने नागरिकांना कार्यालयीन वेळेची अडचण भासणार नाही.

तंत्रज्ञानाचा वापर करून नागरिक-केंद्रित प्रशासन राबवण्याचा प्राधिकरणाचा हा महत्त्वपूर्ण उपक्रम असून, यामुळे प्रशासन व नागरिक यांच्यातील संवाद अधिक सुलभ आणि विश्वासार्ह होणार आहे. डिजिटल इंडिया संकल्पनेला बळ देणारी ही ‘मित्र वाणी’ सेवा नागरिकांसाठी एक विश्वासू डिजिटल सहकारी ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात