मिरा-भाईंदर उड्डाणपुलावर बस अडकल्याचा फोटो खोटा AI द्वारे तयार केल्याचे स्पष्ट
मिरा-भाईंदर येथील उड्डाणपुलावर दोन लेनच्या मध्ये बस अडकल्याचा दावा करणारा फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मात्र हा फोटो पूर्णपणे खोटा असून प्रत्यक्ष घटनेशी त्याचा कोणताही संबंध नाही, अशी माहिती समोर आली आहे.
उड्डाणपुलाच्या रचनेबाबत विशेषतः चार लेनवरून दोन लेनवर येण्याच्या मुद्द्यावर सध्या वाद सुरू असला, तरी व्हायरल फोटोत दाखवलेली घटना प्रत्यक्षात घडलेली नाही. तांत्रिक तपासणीत हा फोटो कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) वापरून तयार केल्याचे स्पष्ट झाले आहे.
नागरिकांनी अशा अफवा व दिशाभूल करणाऱ्या पोस्टवर विश्वास न ठेवता माहितीची खातरजमा करूनच शेअर करावी, असे आवाहन करण्यात येत आहे.