मुंबई सरचिटणीस विक्रांत अशोक पाटील (रिपब्लिकन पार्टी ऑफ खोरीपा) यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश मिळाले आहे.
मुंबईकरांसाठी दिलासादायक आणि लोकहिताचा निर्णय!
GTB नगर रेल्वे स्थानक येथील बंद अवस्थेत असलेली लिफ्ट लवकरात लवकर सुरू करण्यासाठी त्यांनी रेल्वे प्रशासनाशी सतत पत्रव्यवहार करून ठोस भूमिका मांडली. प्रवाशांना—विशेषतः ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग बांधव, महिला आणि लहान मुलांसह प्रवास करणाऱ्यांना होणाऱ्या गैरसोयीची जाणीव करून देत लिफ्ट तातडीने कार्यान्वित करण्याची मागणी त्यांनी ठामपणे लावून धरली.
त्यांच्या प्रयत्नांमुळे आता रेल्वे प्रशासन सकारात्मक पावले उचलत असून, लिफ्ट लवकरच जनतेच्या सेवेत उपलब्ध होणार असल्याची माहिती मिळत आहे. हा केवळ एका सुविधेचा प्रश्न नसून, हजारो प्रवाशांच्या दैनंदिन प्रवासातील सुरक्षितता आणि सुलभतेशी निगडित मुद्दा आहे.
लोकप्रतिनिधी म्हणून जनतेच्या अडचणी समजून घेऊन त्यावर तत्परतेने कार्यवाही करणे हेच खरे लोकसेवेचे उदाहरण आहे. विक्रांत पाटील यांच्या या लोकहिताच्या भूमिकेमुळे परिसरातील नागरिक आणि प्रवाशांमध्ये समाधानाची भावना व्यक्त होत आहे.
“जनतेचा प्रश्न आमची जबाबदारी” या भूमिकेतून केलेल्या या पाठपुराव्यामुळे GTB नगर परिसरातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे