ताजी बातमी

परिसरामध्ये एका सार्वजनिक शौचालयात नऊ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी उघडकीस आली. परिसरातील वड्डी ऊर्फ गुंडप्पा देवेंद्र (३५) याने लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आल्यानंतर त्याला आमच्या हवाली करा, असे सांगत संतप्त नागरिकांनी पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला. 

गुरुवारी रात्री मुलीच्या पालकांनी पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर सर्व परिसर पिंजून काढण्यात आला. पोलिस उपायुक्त परमजितसिंह दहिया, सहायक आयुक्त भरगुडे, व्हावळ यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सावंत, सहायक निरीक्षक राहुल देशमुख, पाटील यांची वेगवेगळी पथके तयार करण्यात आली. पोलिसांचे एक पथक सीसीटीव्ही फूटेजच्या माध्यमातूनही शोध घेत होते. एका पथकाने परिसरातील गुन्हेगारांचा माग घेण्यास सुरुवात केली. शुक्रवारी रात्री वड्डी याला ताब्यात घेण्यात आले. वड्डी याने सन २०१७मध्ये लैगिंक अत्याचार केला होता आणि याप्रकरणात तो जामिनावर बाहेर होता. चौकशीमध्ये वड्डी उडवाउडवीची उत्तरे देत होता. मात्र एका सीसीटीव्ही फूटेजमध्ये तो मुलीसोबत दिसल्याने पोलिसांनी चौकशीचा फास आवळल्यावर वड्डी याने गुन्ह्याची कबुली दिली. मृतदेहाची दुर्गंधी येऊ नये म्हणून तो गटारात टाकल्याचे त्याने सांगितले. वैद्यकीय तपासणीत तिच्यावर बलात्कार झाल्याचे उघडकीस आले. जूहू पोलिसांनी हत्या, बलात्कार आणि पोक्सो कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करून वड्डी याला अटक केली आहे. 

या घृणास्पद प्रकारामुळे जुहू परिसरात संतापाची लाट पसरली. संतप्त नागरिकांनी जुहू पोलिस ठाण्यावर मोर्चा नेला. वड्डी विरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्याला ताब्यात देण्याची मागणी केली. अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोजकुमार शर्मा यांनी घटनास्थळी धाव घेत नागरिकांची समजूत काढली. वड्डी याला जास्तीत जास्त शिक्षेसाठी प्रयत्न केले जातील, हे पटवून दिल्यावर जमाव शांत झाला. 

 
मुलगी गायब झाल्यापासून तिला शोधण्यात वड्डी पुढे होता. इकडे असेल, तिकडे गेली असेल असे भासवून तो पोलिसांची दिशाभूल करत होता. इतकेच नाही तर कुटुंबीयांसोबत वारंवार माहिती घेण्यासाठी पोलिस ठाण्यात येत होता. 

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात