ताजी बातमी

शेतकरी कर्जमाफी, पीकविमा, राम मंदिर या तीन प्रश्नांची उत्तरे भाजपकडून घेण्यात आल्यानंतरच शिवसेनेने युती केली. हिंदुत्ववादी विकासवादी पक्ष एकत्र आल्याने देशाचा फायदा होईल. युती झाली म्हणून मतभेद मिटलेत, असे नाही. नोटाबंदीस आमचा अजूनही विरोध आहे. जे राष्ट्रहिताचे मुद्दे असतील त्यांना आमचा पाठिंबा राहील, असे सांगत शिवसेनेच्या युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेची भूमिका मांडली
नाशिक येथे लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी डोंगरे वसतिगृहाच्या मैदावर आयोजित आदित्य संवाद या कार्यक्रमात ते बोलते होते. यावेळी ओंकार रोकडे या तरुणाने भाजप शिवसेना युती का केली, हा प्रश्न विचारल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी सत्तेत असताना भाजपबरोबर वैचारिक मतभेद होते, असे सांगितले. पण, आता युती झाली असल्याचे सांगून त्यामागची कारणेही सांगितली. या कार्यक्रमात सायली निकम, राहुल चौधरी, मानसी खरकोतकर यांच्यासह अनेक तरुणांनी प्रश्न विचारले. कार्यक्रमाअगोदर विविध क्षेत्रांत यश मिळविणाऱ्या तरुणांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात नाशिकच्या तरुणांचा नाशिक ढोल, रॉक शो झाला. त्यानंतर आदित्य ठाकरे यांचे आगमन झाले. यावेळी त्यांनी, खासदार हेमंत गोडसे यांनी काय काम केले? नाशिकला विद्यापाठीचे उपकेंद्र केव्हा होईल? रोजगाराची संधी केव्हा मिळेल? यांसारख्या प्रश्नांना उत्तरे देत त्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचे आश्वासनही दिले. शिक्षणाचा मुद्दा उपस्थित करीत अभ्यासक्रम बदलण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात