ताजी बातमी

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये रोख रक्कम, दारू, ड्रग्ज आणि आता अवैध शस्त्र जप्तीचे सत्र सुरूच आहे. निवडणूक भरारी पथक आणि पोलिसांनी शनिवारी ४१ लिटर दारू, दीड किलो गांजा तसेच दोन कट्टे जप्त केले आहेत. मतदान होईपर्यंत ही धडक कारवाई अशीच सुरू राहणार असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

निवडणूक जाहीर झाल्यापासून मतदान होईपर्यंतच्या कालावधीत पैशाची देवाणघेवाण, ड्रग्ज, दारू यांच्या तस्करीचे प्रमाण वाढते. उमेदवारांमार्फत मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध आमिषे दाखविली जातात. त्यामुळे निवडणूक आयोगाचे भरारी पथक, पोलिस यांनी गल्लीबोळात गस्त आणि नाकाबंदी अधिक वाढवली आहे. शनिवारी दिवसभरामध्ये विविध कारवायांमध्ये ४१ लिटर दारू जप्त करण्यात आली असून याप्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली. अंमली पदार्थ विरोधी कारवाईत किलो ५०० ग्रँम गांजासह एकाला तर अवैध शस्त्रासंबंधी कारवाईत एक चाकू, दोन कट्टे, एका काडतुसांसह तिघांना अटक करण्यात आली.

बोरिवलीतही शस्त्रे जप्त

बोरिवली पश्चिमेकडील गोरा गांधी हॉटेल येथे काहीजण शस्त्रांसह येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट ७चे उपनिरीक्षक अशोक चव्हाण यांना मिळाली. पोलिस निरीक्षक सतीश तावरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने या ठिकाणी सापळा रचला. संशयास्पद हालचालीवरून संतोष विचारे, संजू जेना या दोघांना ताब्यात घेण्यात आले. अंगझडतीमध्ये त्यांच्याकडे दोन पिस्तूले आणि सहा जिवंत काडतुसे सापडली. हि शस्त्रे त्यांनी कुठून आणली याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात