राष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेत समिक्षाला सुवर्ण पदक
वाको इंडिया किक बॉक्सिंग असोसिएशन व महाराष्ट्र वाको असोसिएशन यांच्या विद्यमाने विद्यमाने पुणे येथिल छत्रपती शिवाजी महाराज क्रिडा संकुल बालेवाडी येथे 24 ते 28 मार्च 2019 दरम्यान राष्ट्रीय किक बॉक्सिंग फेडरेशन कपचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये देशातून जवळ जवळ 27 राज्याचे स्पर्धक उपस्थित होते.
या स्पर्धेत महाराष्ट्राच्या टीम मधील युनायटेड शोतोकान कराटे असोसिएशन या संस्थेचे मार्गदर्शक , अध्यक्ष व महाराष्ट्र वाको असोसिएशन चे उपाध्यक्ष डॉ. मंदार पनवेलकर सर यांच्या कडे किक बॉक्सिंग चे प्रशिक्षण घेत असलेली एल्फिन्स्टन कॉलेज काळाघोडा फोर्ट येथे बी एस सी पहिल्या वर्षात शिकणारी कुमारी समिक्षा दिपक कायंदेकर हिला पॉईंट फाईट प्रकारात सुवर्णपदक मिळाले. तसेच कुमार संचित गंभीरराव याने पॉईंट फाईट मध्ये भाग घेतला.
या दोघांना युनायटेड चे प्रशिक्षक रविंद्र म्हात्रे सर. सागर कोळी सर, निलेश भोसले सर, प्रशांत गांगुर्डे सर, आणि निखिल मते सर यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. या सर्वांनी या दोघांचे अभिनंदन केले.