ताजी बातमी

उन्हाच्या वाढत्या तडाख्याबरोबरच यंदा मुंबईकरांच्या पाणीसाठ्यातही मोठी घट झाली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमध्ये सोमवारपर्यंत २५ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. गेल्या दोन वर्षांच्या पाणीसाठ्याच्या तुलनेत एप्रिलमधील हा नीचांक आहे. कपातीमुळे मुंबईच्या अनेक भागांत आधीच पाणीटंचाई असताना येत्या दोन महिन्यांत ती आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत.

गेल्या वर्षीच्या अपुऱ्या पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये ९१ टक्के पाणीसाठा जमा झाला होता. मुंबईला वर्षभर विनाकपात पाणीपुरवठा करण्यासाठी तलावांमध्ये ऑक्टोबरपर्यंत १४ लाख ४७ हजार दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणीसाठा आवश्यक आहे. मात्र, मागील वर्षीच्या तुलनेत तलावांमध्ये यंदा दोन लाख दशलक्ष लिटर पाणीसाठा कमी आहे. १० टक्के पाणीसाठा कमी झाल्याने पुढील वर्षभराच्या नियोजनासाठी मागील वर्षीच्या नोव्हेंबरमध्ये १० टक्के पाणीकपात लागू करण्यात आली असून, ती समाधानकारक पाऊस पडेपर्यंत कायम राहणार आहे.

सध्याच्या पाणीकपातीमुळे पाण्याला पुरेसा दाब नसल्याने उंचावरील भाग तसेच जुन्या चाळी व झोपडपट्ट्यांमध्ये पाणी पोहोचत नसल्याच्या नगरसेवकांच्या तक्रारी होत्या. प्रशासनाकडून तांत्रिक उपाययोजना केल्याचा दावा करण्यात आला. मात्र त्यानंतरही मालाड कुरार, कांदिवली चारकोप, बोरिवली, वडाळा, सायन, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळीसह अनेक भागात पुरेसे पाणी मिळत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात