ताजी बातमी

मोनोरेलच्या मागे लागलेलं विघ्न अद्याप देखील कायम आहे. तांत्रिक बिघाड झाल्यानं मोनोरेलची सेवा ठप्प झाली आहे. वडाळ्याजवळ हा बिघाड झाला आहे. त्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली आहे. दरम्यान, सेवा सुरळीत होण्यासाठी किमान अर्धा ते पाऊण तास लागू शकतो. त्यामुळे मोनोरेलनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले आहेत. मोनोरेलची सेवा खंडीत होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी देखील कोणत्या ना कोणत्या कारणास्तव मोनोरेलची सेवा खंडीत झालेली होती. आज पुन्हा देखील मोनोरेलची सेवा खंडीत झाली आहे. त्यामुळे प्रवाशांनी मनस्तापाचा सामना करावा लागत आहे.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात