ताजी बातमी

चाळिशी पार केलेला उन्हाचा पारा अन् हैराण करणारा उकाडा अशा परिस्थिती पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, पुणे, सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात शनिवारी गारांसह झालेल्या पावसाने दिलासा दिला असला तरी हा पाऊस द्राक्ष आणि इतर फळपिकांना नुकसानकारक ठरला आहे. येत्या दोन दिवसांत विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राला वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईतही रात्री काही भागांत पाऊस पडला.
गेले पंधरा दिवस राज्यातील उन्हाचा पारा चांगलाच वाढत आहे. शनिवारी विजेचा कडकडाटासह कोल्हापूर शहर व जिल्ह्यात गारांसह पाऊस झाला. सांगली शहरासह जिल्ह्याच्या विविध भागातही पावसाने दमदार हजेरी लावली. अनेक ठिकाणी वादळी वारे व गारांसह जोरदार पाऊस पडला. शिराळा, वाळवा, तासगाव तालुक्यातही गारांसह पावसाने दमदार हजेरी लावली. दुष्काळी, जत, कवठेमहांकाळ, आटपाडी तालुक्यांमध्ये ढगाळवातावरणहोते.
सातारा शहरासह शहराच्या पश्चिमेस कास परिसरात शनिवारी सायंकाळी मेघगर्जनेह पावसाने हजेरी लावली. कास परिसरात मोठ्या प्रमाणावर गारांदेखील पडल्या. सायंकाळी उशिरापर्यंत पाऊस पडतच होता. पुणे शहर, पिंपरी चिंचवड व जिल्ह्याच्या अनेक भागात वादळी वाऱ्यासह हलका पाऊस झाला़ बारामतीतील सुपा येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा सुरु असतानाच पावसाच्या सरी आल्या़ सोलापूर शहर आणि जिल्ह्यात शनिवारी मेघगर्जनेसह पावसाला सुरूवात झाली. सायंकाळचा हा पाऊस रात्री उशिरापर्यंत सुरू होता. शनिवारीपहाटेपर्यंत१.६मि.मी.इतक्यापावसाचीनोंदझालीहोती.
शनिवारी सायंकाळी कोल्हापूर व महाबळेश्वर येथे १ आणि सातारा येथे ३ मिमी पावसाची नोंद झाली.

 

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात