ताजी बातमी

दादर येथील रहिवासी इमारतीतील सट्टेबाजांचा अड्डा शुक्रवारी रात्री पोलिसांनी उद्ध्वस्त केला. दादरच्या बाबुराव परुळेकर मार्गावरील रहिवासी इमारतीत वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिवाकर शेळके यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस निरीक्षक नेताराम म्हस्के, एपीआय देवकर व पथकाने त्या ठिकाणी छापा टाकून आयपीएल सामन्यावर सट्टा घेण्यात व्यस्त असलेल्या उत्तम जैन, संजय लपासीया यांच्यासह तीन सट्टेबाजांना पकडण्यात आले.

सट्टेबाजांच्या या खोलीतून २० मोबाईल, लॅपटॉप, एलईडी स्क्रीनसह अन्य मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत त्यांना अटक करण्यात आली.

 

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात