ताजी बातमी

नोएडामधील मामूरा भागातील दोन तरुण छोटू आणि सुरज यांनी त्यांच्याच घराजवळ राहणाऱ्या एका १६ वर्षाच्या मुलीशी ओळख वाढवून नंतर अपहरण केले. त्यांनी त्या मुलीला एका अनोळखी ठिकाणी नेले आणि तिच्यावर सामुहिक बलात्कार केला. यामध्ये या अपहरण करणाऱ्या दोघांव्यतिरिक्त नोएडा सेक्टर १३५ मध्ये राहणारा आदित्य या त्यांच्या मित्रानेही तिच्यावर अत्याचार आणि मारहाण केली. त्या अल्पवयीन मुलीला ५१ दिवस नरकयातना भोगल्यानंतर तेथून पळून येण्यात यश आले. पण, ती मुलगी शिकलेली नसल्याने तिला अपहरण करुन नेमके कोणत्या ठिकाणी ठेवले होते हे सांगता येत नाही आहे. 

दरम्यान, मुलीच्या नातेवाईकांनी पोलिसांवर सुरुवातीला तक्रार दाखल करून घेण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप केला होता. गुन्हे शाखेच्या एसपींकडे तक्रार केल्यानंतर मग या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आल्याचे नातेवाईकांनी सांगितले. 

या प्रकरणावर पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला पीडीत अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी आरोपींशी तडजोड केली होती. वडिलांनीही दबावात येत तडजोड केली होती असे सांगितले. पोलिसात तक्रार केल्याने त्यांचीच बदनामी होईल म्हणून लिखित स्वरुपाची तडजोड केली होती. फेज ३ च्या एसएचओ अखिलेश त्रिपाठी यांनी हा लिखीत समझोता पोलिस ठाण्यात झाला नसल्याचे सांगितले. त्यांनी आता एफआयआर दाखल केली आहे आणि पीडीत अल्पवयीन मुलीचा जबाब नोंदवणार असल्याचे सांगितले आहे. 

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात