ताजी बातमी

म्हाडाने गोरेगावातील मोतीलालनगरमध्ये केलेल्या ३० हजार कोटी रुपयांच्या गृहनिर्माण प्रकल्प घोषणेबाबत स्थानिकांमध्ये नाराजी उमटली आहे. मोतीलालनगरमधील घरे स्वमालकीची असून त्या घरांशी संबंधित नवीन योजना आखताना स्थानिकांना विश्वासात घेतले जात नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. म्हाडाच्या तडकाफडकी गृहनिर्माण प्रकल्प उभारण्याच्या निर्णयास मोतीलालनगर विकास समितीने विरोध दर्शवला आहे. विधानसभा निवडणुकीचे वारे लक्षात घेऊन हा सनसनाटी निर्णय घेतला असावा, अशीही प्रतिक्रिया मोतीलालनगरमध्ये व्यक्त होते.

 

गोरेगाव पश्चिमेतील मोतीलालनगरमध्ये पुनर्विकासाचा प्रकल्प अनेक वर्षांपासून रखडला आहे. म्हाडाकडून हा प्रकल्प राबवला जाणार आहे. ही योजना राबवली जाताना म्हाडाने स्थानिक रहिवाशांची मते लक्षात घ्यावीत यासाठी रहिवासी सातत्याने आग्रही आहेत. त्यासाठी कोणताही करार करताना तो त्रिपक्षीय असावा, ही त्यांची आग्रही मागणी आहे. हा भाग लक्षात घेता म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून झालेल्या घोषणेने सर्व रहिवासी अचंबित झाले आहेत.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात