ताजी बातमी

सावत्र, गतिमंद मुलीची निर्घृण हत्या करणाऱ्या महिलेला सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. उपाशी ठेवणे, चटके देणे, मारहाण करणे इतक्यावरच थांबता अणकुचीदार पिना घुसवून मुलीचे दोन्ही डोळे  निकामी करेपर्यंत प्रतिभाची मजल पोहोचली. तिने या मुलीवर केलेले अमानुष अत्याचार भांडुप पोलिसांनी सत्र न्यायालयात पुराव्यांनीशी सिद्ध केले.

३० नोव्हेंबर २०१५ रोजी सहा वर्षांच्या पायलचा मृत्यू झाला. भांडुप पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा केला तेव्हा शरीरावर असंख्य जखमा, चटके दिल्याच्या खुणा आढळल्या. पोलिसांनी मृतदेह शवचिकित्सेसाठी राजावाडी रुग्णालयात पाठवला. चिकित्सा करणाऱ्या डॉक्टरांनी या मुलीचे डोळे निकामी करण्यात आले आहेत. मुलीला जागोजागी चटके दिले आहेत. बाह्य़ अंतर्गत अनेक जखमा, व्रण आढळले आहेत, असे अहवालात नमूद केले. तसेच मुलीवरील या अत्याचारांमुळेच तिचा मृत्यू झाल्याचेही स्पष्ट केले. त्यावरून पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवला.

 

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात