ताजी बातमी

दहा दिवसांपूर्वीच कर्तव्यावर रुजू झालेल्या महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या (एमएसएफ) जवानाने शनिवारी सायंकाळी रायफलमधून गोळी झाडून आत्महत्या केली. मोहन रामचंद्र एकनार (२२) असे या जवानाचे नाव असून

याप्रकरणी विलेपार्ले पोलिस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.विलेपार्ले येथील विमानतळ कॉलनीमध्ये त्याची नेमणूक करण्यात आली होती. शनिवारी दुपारी मोहन कर्तव्याच्या ठिकाणी हजर झाला. काही तास कर्तव्य बजावल्यानंतर सायंकाळी पाचच्या सुमारास त्याने रायफलमधून स्वतःवरच गोळी झाडून घेतली. यावेळी त्याच्यासोबत दोन जवान होते. त्यांनी याबाबतची माहिती विलेपार्ले पोलिसांना दिली. पोलिसांनी मोहनला तत्काळ जवळच्या रुग्णालयात नेले. मात्र दाखल करण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात