ताजी बातमी

कल्याण-डोंबिवली महापालिकेत भ्रष्टाचाराच्या प्रकरणांत दिवसेंदिवस वाढ होत आहे. प्रत्येक महिन्यात अधिकारी किंवा कर्मचारी लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकत असून हा आकडा ३६वर पोहोचला आहे. 
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या स्थापनेला ३५ वर्षे उलटून गेली. पालिकेतील वादग्रस्त भ्रष्टाचारी अधिकारी, कर्मचाऱ्यांची यादी दिवसागणिक वाढत आहे. एकीकडे विकासकामे करण्यासाठी पालिकेच्या तिजोरीत पैसे नसल्याची ओरड होत असताना दुसरीकडे मात्र पालिकेतील अधिकारी, पदाधिकारी प्रत्येक कामातील टक्केवारी लाटत आहे. शहरातील विकासकामांशी त्यांना काहीही देणेघेणे नसल्यामुळे करदात्या नागरिकांना मूलभूत सुविधादेखील मिळत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांच्यासह पालिकेतील अनेक बडे अधिकारी आणि कर्मचारी लाखो रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले गेले आहेत. इतकेच नव्हे तर करमाफी देण्यासाठी करदात्या महिलांकडे शरीरसुखाची मागणी करणाऱ्यांनाही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी जेरबंद केले आहे. केवळ पालिकेतील अधिकारीच नव्हे, तर लोकप्रतिनिधीदेखील लाच घेण्यात मागे नसल्याचे दिसून आले. आजवर पालिकेतील गणेश भाने, विद्याधर भोईर यांच्यानंतर गोरख जाधव असे तीन नगरसेवक लाच स्वीकारताना पकडले गेले. काही दिवसांपूर्वी नगरसेवक गोरख जाधव कंत्राटदाराकडून लाच घेताना पकडला गेल्यानंतर २३ मे रोजी अनधिकृत बांधकामावर कारवाई न करण्यासाठी पालिकेच्या क प्रभागातील दोन कर्मचारी लाच घेताना पकडले गेले. यानंतर पालिकेतील भ्रष्टाचारी कर्मचाऱ्यांची संख्या ३६वर पोहोचली.  

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात