ताजी बातमी

घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात मानसिक आजारावर उपचार घेणाऱ्या आईबरोबर राहत असलेल्या एका दीड वर्षीय बालिकेचे मंगळवारी रुग्णालयातून अपहरण झाले आहे. याबाबत टिळकनगर पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करत आरोपींचा शोध सुरू केला आहे.

आरती पोर्टे असे अपहरण झालेल्या मुलीचे नाव असून तिचे पालक भांडुपच्या गणेशनगर परिसरात राहतात. तिच्या आईला मानसिक आजार असल्याने दीड महिन्यापूर्वी तिला घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आरतीदेखील दीड महिन्यापासून तिच्या आईसोबतच या रुग्णालयात वास्तव्यास आहे. मात्र मंगळवारी सायंकाळी अचानक ही मुलगी गायब झाली. रुग्णालयातील सर्वच कर्मचाऱ्यांच्या ती ओळखीची असल्याने सर्वानी तिचा शोध घेतला. मात्र तिचा शोध लागलेला नाही. रात्री याबाबत टिळकनगर पोलीस ठाण्यात रुग्णालयाने तक्रार दाखल केली आहे. रुग्णालयातील सर्व सीसीटीव्ही फुटेजदेखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

 

 

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात